आखूड लोकांचा प्रदेश
सुहास पळशीकर यांच्या एका लेखाचे सन्जोप राव यांनी केलेले सुरेख परीक्षण. अवश्य वाचा.
निव्वळ शब्दांच्या बुडबुड्यांना आणि भाषणबाजीला भाबडेपणानं शरण जाणं, किंबहुना त्याच्या प्रेमातच पडणं या मराठी मनोवृत्तीचं पळशीकरांनी फार छान विश्लेषण केलं आहे. शब्दांच्या कोलांट्या उड्या मारुन तात्काळ हशा आणि टाळ्या मिळवणारे शिवाजीराव भोसले आणि पाठीच्या कण्यात पोलाद भरण्याचे घाऊक कंत्राट घेतलेले सारखे ‘माजी सनदी अधिकारी’ अविनाश धर्माधिकारी यांचे बोलघेवडे ‘थैलर्य’ पळशीकर उघडपणे मांडतात. २००० साल हे आधारभूत मानून त्याच्या अवतीभवतीच्या शंभर कर्त्या मराठी व्यक्तींची यादी करायची झाली तर त्यात निव्वळ मौखिक परंपरावाले - भाषणबाज - अनेक लोक येतील आणि त्यांना वगळायचे ठरवले, तर ही यादी शंभरपर्यंत पोचवायची कशी हा प्रश्न पडेल, हा पळशीकरांचा अंदाज अस्वस्थ करुन जातो.
























No comments
Comments are closed for this post.
Leave a comment
Comments are closed for this post.