प्रियाली सांगताहेत एक समयोचित व्यक्तिचित्र. अवश्य वाचा आणि चर्चेत सहभागी व्हा
ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.










Comments
Comments are closed on this post.