अनु यांनी लिहिलेला ‘कोटेबल‘ लेख. हहपु.
हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्याच चुरगळलेल्या सदर्यावर स्वेटर चढवला होता. वातानुकूलन बंद आणि तरी मी स्वेटर काढत नाही हे पाहून समोर बसणार्या घाम पुसत असलेल्या प्रोग्रॅमर भैय्याने विचारलंच, ‘यहां बर्फ गिर रही है क्या?तुमको ठंड लग रही है? ‘ अशा वेळी मी ‘थोडा बुखार जैसा लग रहा है’ वगैरे ठोकून देते. हपिसात न जाण्यासाठी ‘आजारी’ पडायला ‘बुखार जैसा लगना’ हा अत्युत्तम आजार आहे.









Comments
Comments are closed on this post.