विसोबा यांनी लिहिलेली राम कोण देशीचा ही लेखमालिका वाचायला विसरू नका.
तर ए. एल. बॅशॅम यांच्या “वंडर दॅट वॉज इंडिया’, तसेच सानुजित घोष यांच्या “लिजेन्ड ऑफ राम’ या ग्रंथांनुसार, रामकथेचे काहीसे आपल्या वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच झाले आहे. म्हणजे असे की मूळ रामकथा ही वेगळ्याच ठिकाणी घडली आणि मग आपल्याकडील वाल्मिकी वगैरे कवींनी तीवर हिंदुस्थानी साज चढवून, तिच्यातील पात्रांच्या नावांचे संस्कृतीकरण करून, तसेच त्यात आपल्याकडील गावांची, शहरांची, नद्यांची, सरोवरांची नावे घुसडून वगैरे तिचे एतद्देशीकरण केले. दशरथ आणि राम हे भारताबाहेरच्या एका किरकोळ राज्याचे राजे होते, असे अनुमान काढण्यास जागा आहे, असे बॅशॅम यांनी म्हटले आहे.










Comments
Comments are closed on this post.