Sampada | Marathi, Politics | | #
Sunil argues that Marathi holds a precarious position in Mumbai due to the fact that political parties try to force feed it to the public
The official argument of the Marathi propagating parties is that all residents of Mumbai are guilty of ignoring this language and must be taught to to “respect” it - by being slapped around if necessary. [....] But how much enthusiasm can you generate for a language by slapping people around? Indeed, what image do you give to the language by this behaviour?
Personally, I am surprised to see that Bombayites still feel the pinch of the language’s existence. You can get by in the city without knowing a word of Marathi, or for that matter even Hindi. But I agree with Sunil when he says that Marathi could be made more appealing to the general public by severing it from political parties.
Ash | Marathi, Movies & Music | | #
Over at Aspi’s blog, guest-blogger Pitu reviews Pak Pak Pakaak, the 2005 Marathi comedy which features the directorial debut of Sai Paranjpe’s son, Gautam Joglekar.
Picture this: a lejhim-wielding, chanting crowd winds its way through the dusty roads of a gaon. They are singing the questionable praises of a certain ‘Bhootiya’. A half-crazed man comes screaming out of the woods and the chanting crowd flees in terror. Such are the opening frames of this brilliantly crafted film that blends the lines between reality and illusion.
Yogesh | Marathi | | #
विसोबा यांनी लिहिलेली राम कोण देशीचा ही लेखमालिका वाचायला विसरू नका.
भाग १
भाग २
भाग ३
तर ए. एल. बॅशॅम यांच्या “वंडर दॅट वॉज इंडिया’, तसेच सानुजित घोष यांच्या “लिजेन्ड ऑफ राम’ या ग्रंथांनुसार, रामकथेचे काहीसे आपल्या वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच झाले आहे. म्हणजे असे की मूळ रामकथा ही वेगळ्याच ठिकाणी घडली आणि मग आपल्याकडील वाल्मिकी वगैरे कवींनी तीवर हिंदुस्थानी साज चढवून, तिच्यातील पात्रांच्या नावांचे संस्कृतीकरण करून, तसेच त्यात आपल्याकडील गावांची, शहरांची, नद्यांची, सरोवरांची नावे घुसडून वगैरे तिचे एतद्देशीकरण केले. दशरथ आणि राम हे भारताबाहेरच्या एका किरकोळ राज्याचे राजे होते, असे अनुमान काढण्यास जागा आहे, असे बॅशॅम यांनी म्हटले आहे.
Yogesh | Marathi | | #
अनु यांनी लिहिलेला ‘कोटेबल‘ लेख. हहपु.
हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्याच चुरगळलेल्या सदर्यावर स्वेटर चढवला होता. वातानुकूलन बंद आणि तरी मी स्वेटर काढत नाही हे पाहून समोर बसणार्या घाम पुसत असलेल्या प्रोग्रॅमर भैय्याने विचारलंच, ‘यहां बर्फ गिर रही है क्या?तुमको ठंड लग रही है? ‘ अशा वेळी मी ‘थोडा बुखार जैसा लग रहा है’ वगैरे ठोकून देते. हपिसात न जाण्यासाठी ‘आजारी’ पडायला ‘बुखार जैसा लगना’ हा अत्युत्तम आजार आहे.
Yogesh | Marathi | | #
चौकस यांनी घेतलेला शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा.
राज्य जन्माला येऊन सहा वर्षे झाली होती. ६२ सालच्या चीन युद्धामुळे अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती वा करण्यात आली होती. मुंबईचे आयुष्य तुलनात्मक दृष्ट्या पाहता तेवढेच धकाधकीचे होते. त्यात मराठी माणसाच्या मनात आपल्याला कायम डावलले जातेय अशी भावना निर्माण करायला इतर भाषिक कसोशीने हातभार लावीत होते. तमिळ ब्राह्मण त्यात आघाडीवर होते. त्यांना पन्नाशीच्या दशकापासूनच द्रमुक चळवळीने तामिळनाडूबाहेर हाकलले होते. ‘ब्राह्मण तेवढा ठेचावा’ असे त्या काळातील सर्व द्रविडी पक्षांचे मुख्य धोरण होते. कर्नाटकी ब्राह्मण असलेल्या जयललिता राजकारणात यायला बराच वेळ होता.
Yogesh | Marathi | | #
संजोप राव यांनी ‘देवराई‘ चित्रपटाचे केलेले सुरेख परीक्षण
स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘देवराई’. ‘देवराई’ ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात ‘शेष… शेष…’ अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट संपूर्ण पकड घेतो. वास्तविक या चित्रपटाच्या कथेत मानसिक आजार आणि पर्यावरण असे दोन विषय आहेत. पण या दोन्ही विषयांवर प्रेक्षकाला विचार करायला लावतानाही हा चित्रपट क्षणभरही प्रचारकी थाटाचा वाटत नाही, हे महत्त्वाचे.
Yogesh | Marathi | | #
नंदन ने लिहिलेली ही सुरेख कविता
उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||
लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||
Yogesh | Marathi | | #

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनांबद्दल लिहिताहेत विलास आठवले
निवडणुका आल्या की भूमिका बदलतात.हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र आता परिस्थिती बदलत आहे.मराठी मराठी म्हणून गळा काढणा-यांचंही उत्तरायण सुरू झालं आहे…तेही मागच्या दरवाजानं…
आणि अभिनय कुलकर्णी
उत्तर प्रदेशची उत्तम प्रदेश अशी भलावण करून त्यासाठी अमिताभला ब्रॅंड एम्बेसेडर बनविणार्या मुलायम व अमरसिंह यांनी राज्यासाठी काय केले? जिथे सामान्य माणूस सायंकाळी सुरक्षितपणे फिरूही शकत नाही, हीच तेथील कायदा सुव्यवथा. असे असताना देश बचाव रॅली काढण्यात काय मतलब? ज्यांना आपला प्रदेश वाचविता येत नाही, ते देश काय वाचविणार?
Yogesh | Marathi | | #
नीरजला वळू हा चित्रपट खूप आवडला आहे तर नीरजा यांना आवडलेला नाही. दोन्ही लेख अवश्य वाचा. सोबत वळूचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा ब्लॉगही पहा.
Yogesh | Marathi | | #
कौस्तुभला ग्लोबल वॉर्मिंगबद्दल काय वाटते ते अवश्य वाचा.
अगदी नुकतंच अल् गोर आणि IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल बद्दल ऐकलं आणि मी या विषयात लक्षं घालायचं ठरवलं. इतके दिवस अंटार्क्टिका खंडातील बर्फ वितळतोय वगैरे गप्पांशी मला काही फारसं देणं-घेणं नव्हतं. पण सहज म्हणून इंटरनेट वर फिरताना अंटार्क्टिकाचे हे फोटो पाहिले आणि मी भारावून गेलो.