DesiPundit » Marathi http://www.desipundit.com The Best of the Indian Blogosphere Mon, 12 May 2008 00:00:00 +0000 http://wordpress.org/?v=2.5.1 en Politics and language http://www.desipundit.com/2008/04/22/politics-and-language/ http://www.desipundit.com/2008/04/22/politics-and-language/#comments Wed, 23 Apr 2008 02:00:26 +0000 Sampada http://www.desipundit.com/?p=9208 Sunil argues that Marathi holds a precarious position in Mumbai due to the fact that political parties try to force feed it to the public

The official argument of the Marathi propagating parties is that all residents of Mumbai are guilty of ignoring this language and must be taught to to “respect” it - by being slapped around if necessary. [....] But how much enthusiasm can you generate for a language by slapping people around? Indeed, what image do you give to the language by this behaviour?

Personally, I am surprised to see that Bombayites still feel the pinch of the language’s existence. You can get by in the city without knowing a word of Marathi, or for that matter even Hindi. But I agree with Sunil when he says that Marathi could be made more appealing to the general public by severing it from political parties.

]]>
http://www.desipundit.com/2008/04/22/politics-and-language/feed/
Pak Pak Pakaak review http://www.desipundit.com/2008/03/30/pak-pak-pakaak-review/ http://www.desipundit.com/2008/03/30/pak-pak-pakaak-review/#comments Sun, 30 Mar 2008 23:00:36 +0000 Ash http://www.desipundit.com/2008/03/30/pak-pak-pakaak-review/ Over at Aspi’s blog, guest-blogger Pitu reviews Pak Pak Pakaak, the 2005 Marathi comedy which features the directorial debut of Sai Paranjpe’s son, Gautam Joglekar.

Picture this: a lejhim-wielding, chanting crowd winds its way through the dusty roads of a gaon. They are singing the questionable praises of a certain ‘Bhootiya’. A half-crazed man comes screaming out of the woods and the chanting crowd flees in terror. Such are the opening frames of this brilliantly crafted film that blends the lines between reality and illusion.

]]>
http://www.desipundit.com/2008/03/30/pak-pak-pakaak-review/feed/
राम कोण देशीचा http://www.desipundit.com/2008/03/07/raam/ http://www.desipundit.com/2008/03/07/raam/#comments Fri, 07 Mar 2008 16:40:47 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/03/07/raam/ विसोबा यांनी लिहिलेली राम कोण देशीचा ही लेखमालिका वाचायला विसरू नका.

भाग १
भाग २
भाग ३

तर ए. एल. बॅशॅम यांच्या “वंडर दॅट वॉज इंडिया’, तसेच सानुजित घोष यांच्या “लिजेन्ड ऑफ राम’ या ग्रंथांनुसार, रामकथेचे काहीसे आपल्या वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच झाले आहे. म्हणजे असे की मूळ रामकथा ही वेगळ्याच ठिकाणी घडली आणि मग आपल्याकडील वाल्मिकी वगैरे कवींनी तीवर हिंदुस्थानी साज चढवून, तिच्यातील पात्रांच्या नावांचे संस्कृतीकरण करून, तसेच त्यात आपल्याकडील गावांची, शहरांची, नद्यांची, सरोवरांची नावे घुसडून वगैरे तिचे एतद्देशीकरण केले. दशरथ आणि राम हे भारताबाहेरच्या एका किरकोळ राज्याचे राजे होते, असे अनुमान काढण्यास जागा आहे, असे बॅशॅम यांनी म्हटले आहे.

]]>
http://www.desipundit.com/2008/03/07/raam/feed/
मी, ऋतू आणि कोटमंडळी http://www.desipundit.com/2008/03/07/kotmandali/ http://www.desipundit.com/2008/03/07/kotmandali/#comments Fri, 07 Mar 2008 16:36:47 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/03/07/kotmandali/ अनु यांनी लिहिलेला ‘कोटेबल‘ लेख. हहपु.

हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्‍याच चुरगळलेल्या सदर्‍यावर स्वेटर चढवला होता. वातानुकूलन बंद आणि तरी मी स्वेटर काढत नाही हे पाहून समोर बसणार्‍या घाम पुसत असलेल्या प्रोग्रॅमर भैय्याने विचारलंच, ‘यहां बर्फ गिर रही है क्या?तुमको ठंड लग रही है? ‘ अशा वेळी मी ‘थोडा बुखार जैसा लग रहा है’ वगैरे ठोकून देते. हपिसात न जाण्यासाठी ‘आजारी’ पडायला ‘बुखार जैसा लगना’ हा अत्युत्तम आजार आहे.

]]>
http://www.desipundit.com/2008/03/07/kotmandali/feed/
शिवसेना - भूत, वर्तमान आणि भविष्य http://www.desipundit.com/2008/03/07/shivasena/ http://www.desipundit.com/2008/03/07/shivasena/#comments Fri, 07 Mar 2008 16:35:24 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/03/07/shivasena/ चौकस यांनी घेतलेला शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा.

राज्य जन्माला येऊन सहा वर्षे झाली होती. ६२ सालच्या चीन युद्धामुळे अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती वा करण्यात आली होती. मुंबईचे आयुष्य तुलनात्मक दृष्ट्या पाहता तेवढेच धकाधकीचे होते. त्यात मराठी माणसाच्या मनात आपल्याला कायम डावलले जातेय अशी भावना निर्माण करायला इतर भाषिक कसोशीने हातभार लावीत होते. तमिळ ब्राह्मण त्यात आघाडीवर होते. त्यांना पन्नाशीच्या दशकापासूनच द्रमुक चळवळीने तामिळनाडूबाहेर हाकलले होते. ‘ब्राह्मण तेवढा ठेचावा’ असे त्या काळातील सर्व द्रविडी पक्षांचे मुख्य धोरण होते. कर्नाटकी ब्राह्मण असलेल्या जयललिता राजकारणात यायला बराच वेळ होता.

]]>
http://www.desipundit.com/2008/03/07/shivasena/feed/
का कल्लोळ कल्लोळ - देवराई http://www.desipundit.com/2008/03/07/devarai/ http://www.desipundit.com/2008/03/07/devarai/#comments Fri, 07 Mar 2008 16:34:03 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/03/07/devarai/ संजोप राव यांनी ‘देवराई‘ चित्रपटाचे केलेले सुरेख परीक्षण

स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘देवराई’. ‘देवराई’ ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात ‘शेष… शेष…’ अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट संपूर्ण पकड घेतो. वास्तविक या चित्रपटाच्या कथेत मानसिक आजार आणि पर्यावरण असे दोन विषय आहेत. पण या दोन्ही विषयांवर प्रेक्षकाला विचार करायला लावतानाही हा चित्रपट क्षणभरही प्रचारकी थाटाचा वाटत नाही, हे महत्त्वाचे.

]]>
http://www.desipundit.com/2008/03/07/devarai/feed/
तिचे अभंग तिची गाथा http://www.desipundit.com/2008/03/07/tiche-abhang/ http://www.desipundit.com/2008/03/07/tiche-abhang/#comments Fri, 07 Mar 2008 16:32:17 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/03/07/tiche-abhang/ नंदन ने लिहिलेली ही सुरेख कविता

उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

]]>
http://www.desipundit.com/2008/03/07/tiche-abhang/feed/
‘राज’ का ‘रण’? http://www.desipundit.com/2008/02/04/rajakaran-2/ http://www.desipundit.com/2008/02/04/rajakaran-2/#comments Tue, 05 Feb 2008 05:06:55 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/02/04/rajakaran-2/

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनांबद्दल लिहिताहेत विलास आठवले

निवडणुका आल्या की भूमिका बदलतात.हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र आता परिस्थिती बदलत आहे.मराठी मराठी म्हणून गळा काढणा-यांचंही उत्तरायण सुरू झालं आहे…तेही मागच्या दरवाजानं…

आणि अभिनय कुलकर्णी

उत्तर प्रदेशची उत्तम प्रदेश अशी भलावण करून त्यासाठी अमिताभला ब्रॅंड एम्बेसेडर बनविणार्‍या मुलायम व अमरसिंह यांनी राज्यासाठी काय केले? जिथे सामान्य माणूस सायंकाळी सुरक्षितपणे फिरूही शकत नाही, हीच तेथील कायदा सुव्यवथा. असे असताना देश बचाव रॅली काढण्यात काय मतलब? ज्यांना आपला प्रदेश वाचविता येत नाही, ते देश काय वाचविणार?

]]>
http://www.desipundit.com/2008/02/04/rajakaran-2/feed/
वळू बद्दल http://www.desipundit.com/2008/02/02/valu/ http://www.desipundit.com/2008/02/02/valu/#comments Sat, 02 Feb 2008 16:14:50 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/02/02/valu/ नीरजला वळू हा चित्रपट खूप आवडला आहे तर नीरजा यांना आवडलेला नाही. दोन्ही लेख अवश्य वाचा. सोबत वळूचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा ब्लॉगही पहा.

]]>
http://www.desipundit.com/2008/02/02/valu/feed/
चिंता करितो विश्वाची http://www.desipundit.com/2008/01/25/chinta/ http://www.desipundit.com/2008/01/25/chinta/#comments Sat, 26 Jan 2008 05:29:35 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/25/chinta/ कौस्तुभला ग्लोबल वॉर्मिंगबद्दल काय वाटते ते अवश्य वाचा.

अगदी नुकतंच अल् गोर आणि IPCC (Intergovernmental Panel on Climate Change) यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल बद्दल ऐकलं आणि मी या विषयात लक्षं घालायचं ठरवलं. इतके दिवस अंटार्क्टिका खंडातील बर्फ वितळतोय वगैरे गप्पांशी मला काही फारसं देणं-घेणं नव्हतं. पण सहज म्हणून इंटरनेट वर फिरताना अंटार्क्टिकाचे हे फोटो पाहिले आणि मी भारावून गेलो.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/25/chinta/feed/
कॅटाटोनिया http://www.desipundit.com/2008/01/25/catatonia/ http://www.desipundit.com/2008/01/25/catatonia/#comments Sat, 26 Jan 2008 05:26:43 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/25/catatonia/ गायत्रीने लिहिलेला सुरेख लेख. पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा.

खरे तर नाचताना तिला तसे काही होत नसावे असे मला वाटते. कसे होत असावे ते कसे कळावे बरे?
सरकडोक्या मित्र इथे जवळपास नाही ते बरे. लोकांच्या मनात त्याला घुसता येते असे तो सांगतो. मानसशास्त्राची पदवी जवळ असली म्हणजे लोकांचे स्वत:विषयी असे गैरसमज होतात. जर त्याचे म्हणणे खरे असते तर मी स्वत:च्या मनात लोकहितवादींचे रूप घेऊन वावरतो आणि त्यांच्या काळानुरूप (माझ्या कल्पनेनुसार..इथे कुणाला माहिती आहे त्यांच्या काळाबद्दल खरेखुरे?) बोलतो हे त्याला कळले नसते?

]]>
http://www.desipundit.com/2008/01/25/catatonia/feed/
अंदाज तारखांचा… http://www.desipundit.com/2008/01/25/andaj-tarakhancha/ http://www.desipundit.com/2008/01/25/andaj-tarakhancha/#comments Sat, 26 Jan 2008 05:23:02 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/25/andaj-tarakhancha/ माझे आवडते कवी केशवसुमार यांची भन्नाट कविता.

एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा

ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा

]]>
http://www.desipundit.com/2008/01/25/andaj-tarakhancha/feed/
माझी नवी मैत्रीण http://www.desipundit.com/2008/01/25/navi-maitrin/ http://www.desipundit.com/2008/01/25/navi-maitrin/#comments Sat, 26 Jan 2008 05:21:33 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/25/navi-maitrin/ सर्वसाक्षी लिहिताहेत त्यांच्या नव्या मैत्रिणीबद्दल. अवश्य वाचा.

मारे आवरून आटोपून नाश्ता करून हॉटेल मधून सामानसह बाहेर पडलो आणि विमानतळाच्या दिशेने निघालो मात्र… सकाळी उठल्यावर ज्याचे कौतुक केले ते धुके आता प्रश्नचिन्ह हो‌उन उभे ठाकलेले दिसत होते. रस्त्यात पन्नास फुटांपलिकडचे दिसत नव्हते तर उड्डाण रखडणार हे न दिसणार्‍या सूर्या‌इतके स्पष्ट होते. मात्र तिथे जा‌ऊन ठाकलेले बरे, उशीर असला तर काढु वेळ असे म्हणत असतानाच हस्तसंच वाजला. हुंगयान होती, धुक्यामुळे तिला वनज्झौ ला पोचायला उशीर होणार होता, कदाचित संपूर्ण दिवस रखडून ती संध्याकाळी उशीराने मला भेटणार होती. मात्र काम अडणार नाही असा दिलासा देत तिने वनज्झौ विमानतळावर मला आणायला अमिशी येत असून तिला इंग्रजी येते असा दिलासा दिला. अंदाजा प्रमाणे तीन तासाच्या विलंबाने अखेर एकच्या सुमारास उड्डाण भरले आणि दोन वाजता वनज्झौला दाखल झालो. विमानत़ळावर अमिशी माझ्या नावाची पताका घे‌ऊन हजर होती, त्यामुळे तिला ओळखायला अडचण पडली नाही. बरोबर हु महाशय होते, ज्या आस्थापनेला भेट द्यायची होती तिचे संचालक.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/25/navi-maitrin/feed/
लढा लहानगीचा http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha-2/ http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha-2/#comments Mon, 21 Jan 2008 06:05:22 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha-2/ प्रियाली सांगताहेत एक समयोचित व्यक्तिचित्र. अवश्य वाचा आणि चर्चेत सहभागी व्हा

ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha-2/feed/
http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha/ http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha/#comments Mon, 21 Jan 2008 06:03:19 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha/ प्रियाली सांगताहेत एक समयोचित व्यक्तिचित्र. अवश्य वाचा आणि चर्चेत सहभागी व्हा

ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/20/ladha-lahangicha/feed/
आखूड लोकांचा प्रदेश http://www.desipundit.com/2008/01/05/akhood-lokancha-pradesh/ http://www.desipundit.com/2008/01/05/akhood-lokancha-pradesh/#comments Sat, 05 Jan 2008 18:39:33 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/05/akhood-lokancha-pradesh/ सुहास पळशीकर यांच्या एका लेखाचे सन्जोप राव यांनी केलेले सुरेख परीक्षण. अवश्य वाचा.

निव्वळ शब्दांच्या बुडबुड्यांना आणि भाषणबाजीला भाबडेपणानं शरण जाणं, किंबहुना त्याच्या प्रेमातच पडणं या मराठी मनोवृत्तीचं पळशीकरांनी फार छान विश्लेषण केलं आहे. शब्दांच्या कोलांट्या उड्या मारुन तात्काळ हशा आणि टाळ्या मिळवणारे शिवाजीराव भोसले आणि पाठीच्या कण्यात पोलाद भरण्याचे घाऊक कंत्राट घेतलेले सारखे ‘माजी सनदी अधिकारी’ अविनाश धर्माधिकारी यांचे बोलघेवडे ‘थैलर्य’ पळशीकर उघडपणे मांडतात. २००० साल हे आधारभूत मानून त्याच्या अवतीभवतीच्या शंभर कर्त्या मराठी व्यक्तींची यादी करायची झाली तर त्यात निव्वळ मौखिक परंपरावाले - भाषणबाज - अनेक लोक येतील आणि त्यांना वगळायचे ठरवले, तर ही यादी शंभरपर्यंत पोचवायची कशी हा प्रश्न पडेल, हा पळशीकरांचा अंदाज अस्वस्थ करुन जातो.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/05/akhood-lokancha-pradesh/feed/
भाकरीचा चंद्र http://www.desipundit.com/2008/01/05/bhakaricha-chandra/ http://www.desipundit.com/2008/01/05/bhakaricha-chandra/#comments Sat, 05 Jan 2008 18:36:59 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/05/bhakaricha-chandra/ प्रियाली यांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख वाचा आणि उपक्रमावरील चर्चेत अवश्य सहभागी व्हा.

“जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे” हा प्रश्न माझ्यासारख्या खवय्यांना विचारला तर उत्तर कोणते मिळेल ते वेगळ्याने सांगायची गरज वाटत नाही. गरीबाची भूक असो वा श्रीमंताची भूक किंवा सुर्व्यांच्या कवितेतील अगतिकताही शेवटी भाकरीपर्यंत येऊन विसावते. ज्या भाकरीपायी जगण्याला अर्थ लाभतो ती भाकरी, पोळी, चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील, गरीबांपासून श्रीमंतांना परवडणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. इंग्रजीत अशा अन्नाला स्टेपल फूड असे म्हणतात. उपलब्ध धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या पाव (ब्रेड) आणि चपाती (फ्लॅटब्रेड) जगातील अनेक देशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. या ब्रेड आणि चपातीची ओळख जगाला नेमकी कधी पटली हे शोधणे तसे कठिण आहे परंतु माणसाने अन्न शिजवायला सुरुवात केल्यावर लवकरच त्याने पाव आणि चपाती बनवायला सुरुवात केली असावी असे मत मांडले जाते. जगातील बहुतांश देशांत (अतिपूर्वेकडील काही देश वगळता, चू. भू. दे.घे) पाव आणि त्याचे विविध प्रकार मुख्य आहारात घेतले जातात. या लेखात जगभरातील काही प्रसिद्ध चपात्यांची (फ्लॅटब्रेड्स) ओळख करून घेता येईल.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/05/bhakaricha-chandra/feed/
रतनगड ते हरिश्चंद्रगड http://www.desipundit.com/2008/01/05/ratangad-harishchandragad/ http://www.desipundit.com/2008/01/05/ratangad-harishchandragad/#comments Sat, 05 Jan 2008 18:35:12 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2008/01/05/ratangad-harishchandragad/ आनंद यांनी केलेला अविस्मरणीय रतनगड ते हरिश्चंद्रगड ट्रेक. नक्की वाचा.

रतनगडाला जायला संगमनेर ते इगतपुरी ह्या रस्त्यावरील शिंदी ह्या गावावरून जाता येते. पुण्यावरून दु. १:३० ची एक एस.टी तिकडे जाते, पण संध्याकाळी तिकडे पोचली तर रात्रीची रतनवाडीला जायला जीप मिळेलच ह्याची खात्री नाही. तसेच अर्धा दिवस प्रवासातच जातो. जास्ती लोक असतील तर हे परवडते, कारण जीप तिकडे यायला तयार होतील. आम्ही चारजणच असल्यामुळे रात्रीच निघायचे ठरवले. संगमनेर पर्यंत एस.टी मिळते, नंतर इगतपुरीसाठी रात्रीची एस.टी नाही.

]]>
http://www.desipundit.com/2008/01/05/ratangad-harishchandragad/feed/
एका लग्नाची गोष्ट! http://www.desipundit.com/2007/12/20/lagnachi-goshta/ http://www.desipundit.com/2007/12/20/lagnachi-goshta/#comments Fri, 21 Dec 2007 04:28:18 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2007/12/20/lagnachi-goshta/ स्वाती दिनेश यांनी लिहिलेल्या या लेखाबाबत एका वाचकाच्या शब्दात म्हणायचे तर…

“लगीन असावे तर असे! वधूने माळ घालताना उंच उचलून धरलेला वर, भर दुपारच्या उन्हात टायने घाम पुसणाऱ्या वरापुढे सफारी, फेटा आणि रिफ्लेक्टर गॉगल घालून आडवेतिडवे नाचणारे वऱ्हाडी, भटजींना फेकून मारलेल्या अक्षता, लांब नावाच्या सिनेमात किंवा मालिकेत बघून चपला लपवून ठेवणे किंवा तत्सम केलेले प्रकार आणि आपादमस्तक तिळपापड करणारा तो ‘जीजाजी’ नामक शब्द… हे सगळे नसलेले लग्न फारच आवडले. जर्मनांचे खाद्यप्रेमही.”

]]>
http://www.desipundit.com/2007/12/20/lagnachi-goshta/feed/
’गुंडाळलेलं’ प्रेम! http://www.desipundit.com/2007/12/18/gundalalela-prem/ http://www.desipundit.com/2007/12/18/gundalalela-prem/#comments Tue, 18 Dec 2007 15:19:26 +0000 Yogesh http://www.desipundit.com/2007/12/18/gundalalela-prem/ पूनम यांनी लिहिलेली ही सुरेख कथा.

पण मला सांगा, हे नुसते चेहरे लपवून काही होतं का हो? (साधी पाणीपुरीही धड खाता येत नाही! ) त्या मुलीच्या ड्रेसवरून, पर्सवरून, अगदी तिने घातलेल्या सॅंडलवरूनही तिला सहज ओळखता येईल.. आणि मुलाकडे तर आख्खी दुचाकीच.. त्याच्या नंबरप्लेटवरून त्याला लांबूनही ओळखता येईल की. ते ज्या कोणापासून लपत आहेत ते काय इतके मूर्ख असतील का की येणार्‍याजाणार्‍या लोकांच्या फक्त तोंडाकडेच पहातील? बाकी काही दिसत नाही त्यांना असं यांना वाटतं का? प्रेमात ते दोघं आंधळे असतील हो, बाकी लोक कसे असतील, नाही का?

]]>
http://www.desipundit.com/2007/12/18/gundalalela-prem/feed/